Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे –

पुणे शहरात आज 328 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 1 लाख 75 हजार 743 इतकी झाली आहे. आज आठ

- Advertisement -

रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 4 हजार 572 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 279 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर 1 लाख 66 हजार 69 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 161 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 77 जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात एक जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 95 हजार 231 वर पोहचली असून पैकी 91 हजार 784 जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 754 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या