Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई –

महाराष्ट्रात आज 2 हजार 886 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर दिवसभरात 3 हजार 980 जण बरे झाल्याने त्यांना

- Advertisement -

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आज 52 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 20 लाख 878 वर पोहचली आहे.

सध्या राज्यात 45 हजार 622 अ‍ॅक्टिव्ह केसेस असून, 19 लाख 3 हजार 408 जण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, करोनामुळे 50 हजार 634 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 95.13 टक्के आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,40,19,188 नमुन्यांपैकी 20 लाख 878 (14.27टक्के) नमून पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 12 हजार 23 जण गृहविलगीकरणात तर, 1 हजार 936 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या