Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणार्‍यांची संख्या दुप्पट

राज्यात करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणार्‍यांची संख्या दुप्पट

मुंबई –

महाराष्ट्रात आज दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या

- Advertisement -

दुप्पट आहे. तर, 187 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात आज 8 हजार 522 नवे करोनाबाधित आढळले असून, 15 हजार 356 जणांनी करोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 84.03 टक्क्यांवर पोहचला आहे.

राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 15 लाख 43 हजार 837 वर पोहचली आहे. यामध्ये 2 लाख 5 हजार 415 अ‍ॅक्टिव केसेस, करोनामुक्त झालेले 12 लाख 97 हजार 252 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 40 हजार 701 जणांच्या संख्येचा समावेश आहे. सद्यस्थितीस 23 लाख 37 हजार 899 जण गृहविलगीकरणात आहेत. तर, 25 हजार 857 संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासल्या गेलेल्या 77 लाख 62 हजार 05 नमून्यांपैकी 15 लाख 43 हजार 837 नमूने(19.89 टक्के) करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या