Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

मुंबईत आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

मुंबई –

मुंबईत आज 6 हजार 123 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 294 रुग्ण बरे होऊन

- Advertisement -

घरी परतले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील एकूण करोनाबाधितांची आकडा 3 लाख 91 हजार 751 वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत 11 हजार 641 जणांचा मृत्यू झाला असून 2 लाख 37 हजार 555 जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या 41 हजार 609 जणांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात मुंबईत 48 हजार 75 जणांच्या करोनाचा चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत 39 लाख 36 हजार 930 जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील रिकव्हरी रेट 86 टक्के असून कोरोनाचा वाढीव दर 1.6 टक्के इतका आहे. तर मुंबईतील दुप्पटीचा दर 63 दिवस आहे. मुंबईत सध्या 53 कंटेनमेंट झोन असून 551 सक्रिय सीलबंद इमारती आहेत अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या