Thursday, May 2, 2024
Homeनगरतोफखाना : पोटनिवडणुक सोमवारनंतर

तोफखाना : पोटनिवडणुक सोमवारनंतर

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जूनमध्ये होणार्‍या महापौरपदाच्या निवडणुकीअगोदरच तोफखान्यातील वार्डाच्या पोटनिवडणुकीचा बार सोमवारनंतर

- Advertisement -

केव्हाही उडेल, अशी माहिती सूत्रांकडून समजली. सार्वत्रिक निवडणुकांना स्थगिती देताना पोटनिवडणुकींना वगळण्यात आल्याने राज्यातील 25 महापालिकांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. त्याची तयारी नगर महापालिकेने पूर्ण केली आहे. अंतिम मतदारयादी आणि आता मतदान केंद्रांची ठिकाणे जाहीर झाल्याने आयोगाच्या आदेशाकडे पालिकेसह नगरकरांचे लक्ष लागले आहे.

श्रीपाद छिंदमचे पद रद्द झाल्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. गत महिन्यात मतदार यादी अंतिम करण्यात आली. नव्या मतदार यादीनुसार 18 हजार 239 मतदार पोटनिवडणुकीत मतदानासाठी पात्र ठरले आहेत. मतदार यादीनंतर महापालिका प्रशासनाने मतदान केंद्राची नावेही घोषित केली आहेत. त्यानुसार पत्रकार चौकातील सारडा कॉलेज, संबोधी आणि बागडपट्टीतील सीताराम सारडा शाळेत 24 मतदान केंद्रावर पोटनिवडणुकीसाठी मतदान घेतले जाणार आहेत.

शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्या स्थगितीतून मात्र पोटनिवडणुकांना वगळण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील 25 महापालिका क्षेत्रात सोमवारनंतर केव्हाही पोटनिवडणुकीचा प्रोग्रॅम जाहीर केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

तर पोटनिवडणुकीचा उमेदवारही महापौर रेसमध्ये

जून महिन्यात महापौर पदाची निवडणूक होणार आहे. महापौर पद हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. पोटनिवडणूक होणार्‍या तोफखाना वार्डाची जागा ही ओपन आहे. ओपनच्या जागेवर अनुसूचित जाती महिला उमेदवार उभा करून ती महापौर पदाच्या रेसमध्ये उतरविण्याचे डावपेच राजकीय पक्षांकडून आखले जात आहेत.

सव्वा-सव्वाचा फॉर्म्युला?

राखीव महापौर पदासाठी शिवसेनेकडे तीन, राष्ट्रवादीकडे एक आणि काँग्रेसकडे एक असे पाच उमेदवार आहेत. महापालिकेतील संख्याबळ पाहता शिवसेने दावेदार मानली जात असली तरी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या पाहता नगरसेवक पदा सव्वा सव्वा वर्षात विभागणी होऊ शकते. त्यामुळे या वार्डातून महापौर पदाचा नवा चेहरा समोर येतो की कसे? याकडे नगरकरांचे लक्ष लागून असणार आहे.

मतदान केंद्राचे नाव संख्या

पेमराज सारडा कॉलेज,

पत्रकार चौक……8

रेसिडेन्सिअल,हायस्कूल

लालटाकी ………6

संबोधी विद्यालय …….4

सिताराम सारडा, बागडपट्टी…….6

- Advertisment -

ताज्या बातम्या