Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईत लहान मोटर वाहनांना टोलमाफी! आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबईत लहान मोटर वाहनांना टोलमाफी! आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । Mumbai

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता (Maharashtra Vidhan Sabha Election) कधी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून विविध निर्णय घेण्याचा सपाटा सुरु आहे.

- Advertisement -

आजची मंत्रिमंडळांची बैठक सुरु झाली आहे. शिंदे सरकारची ही शेवटची बैठक असल्याचे बोलले जाते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

YouTube video player

वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरून जाताना लहान वाहनांवर टोलचा भार होता. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लहान वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून लहान वाहनांकडून या पाचही टोलनाक्यांवरून टोल घेतला जाणार नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला, या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांचा टोल ४५ रुपये करण्यात आला होता. दर तीन वर्षांनी टोलवाढीच्या नियमांतर्गत ही वाढ करण्यात आली होती. सन २००० पासून, मुंबईत ये-जा करणारे लोक शहराच्या प्रवेशद्वारावर टोल शुल्क भरत आहेत. शहरातील उड्डाणपुलांच्या बांधकामाशी संबंधित खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टोल लागू केला होता.

दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे बोललं जात आहे. यामुळे आज मंत्रालयाबाहेर सर्वसामान्य नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहे.

यामुळे कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात लगबग पाहायला मिळत आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके कोणाचे प्रश्न मार्गी लागणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याआधी विविध योजना आणि कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

महेश

“तेव्हा मला मुंबईकर म्हणून लाज वाटते…”; महेश मांजरेकरांकडून खंत व्यक्त

0
मुंबई | Mumbaiमुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची...