Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याघंटागाडी ठेक्याला उद्या मुहूर्त

घंटागाडी ठेक्याला उद्या मुहूर्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका प्रशासनाने आगामी पाच वर्षांसाठी शहरातील केरकचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीचा ठेका दिला असून कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या एक डिसेंबरपासून नव्या ठेकेदारामार्फत शहरातील कचरा गोळा होणार आहे, अशी माहिती महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली.

- Advertisement -

नव्या ठेक्यासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेनुसार शहरातील केरकचरा संकलनासाठी तब्बल 397 घंटागाड्या रस्त्यावर उतरविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे घंटागाड्या आता सकाळी एक तास अगोदर म्हणजेच सकाळी 7 ऐवजी 6 वाजताच हजर होणार आहेत.

घंटागाडीच्या जुन्या ठेक्याचा पाच वर्षांचा कालावधी दि. 4 डिसेंबर 2021 रोजी संपुष्टात आला होता. या मुदतीपूर्वी सहा महिने अगोदर नवीन ठेक्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश दिले जाणे आवश्यक होते. मात्र, महासभेची प्रशासकीय मान्यता वेळेवर मिळून देखील घंटागाडीच्या नवीन ठेक्याची निविदा प्रक्रिया प्रशासनाकडून निर्धारित मुदतीत पूर्ण केली गेली नाही.

घंटागाडीच्या नवीन ठेक्याला 1 डिसेंबरचा मुहूर्त लाभला आहे. नाशिक पश्चिम व नवीन नाशिक वॉटरग्रेस, पंचवटी व सातपूरमध्ये अन्थोनी गॅरेज एन्वा कंपनी, नाशिकरोडला तनिष्क, तर नाशिक पूर्व येथे सय्यद आसिफ अली हे ठेकेदार घंटागाडी व्यवस्थापन करणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या