Thursday, March 13, 2025
Homeक्राईमछळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पती, सासू- सासरे व एका महिलेच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नवनागापूरच्या चेतना कॉलनीत घडली होती. तेजल संग्राम भापकर (रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती, सासू- सासरे व एक महिला अशा चौघांच्या विरोधात तेजलला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मयत तेजलचे वडील पाटीलबा मारूती थेटे (रा. कोल्हार भगवतीपूर, ता. राहाता) यांनी फिर्याद दिली आहे. पती संग्राम विठ्ठल भापकर, सासू संगीता विठ्ठल भापकर, सासरा विठ्ठल पोपट भापकर आणि एक महिला अशा चौघांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी पती संग्राम भापकर याला अटक केली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. तेजलचा विवाह 19 डिसेंबर 2021 रोजी संग्राम सोबत झाला होता. मात्र संग्रामचे नाजूक संबंध तेजलला समजल्यावर तिने विचारणा केली असता संग्राम याने तिला मारहाण करत त्रास द्यायला सुरूवात केली. तसेच तिला माहेरून पैसे आणण्यास सांगू लागला.

एकदा तिने माहेरून 1 लाख रुपये आणूनही दिले होते. मात्र त्याची मागणी वारंवार होऊ लागली. तिला होणार्‍या त्रासाबाबत तिने माहेरी सांगितलेही होते. सन 2023 च्या सुरूवातीला पतीच्या नाजूक संबंधावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाले. त्यामुळे तिने स्वतः हातावर ब्लेडने वार करून घेतले होते. त्यावेळी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर 15 दिवस ती माहेरी राहिली. त्यावेळी सासू, सासरे व त्यांचे आणखी एक नातेवाईक तिच्या माहेरी गेले. यापुढे असे होणार नाही असे सांगत तिला सासरी घेऊन आले.

मात्र तिच्या पतीच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही. महिलाही तेजलला त्रास द्यायला लागली. सासू सासरे मात्र त्यांच्या मुलाचीच बाजू घेत तेजलशी वाद घालून तिला त्रास देत होते. या सर्वांच्या त्रासाला कंटाळून अखेर तेजल हिने बुधवारी (11 सप्टेंबर) सायंकाळी राहत्या घरात फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत प्रारंभी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र गुरूवारी (12 सप्टेंबर) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...