Friday, May 3, 2024
Homeनगरट्रॅक्टर व्यवहारात शेतकर्‍याला चार लाखाला गंडा

ट्रॅक्टर व्यवहारात शेतकर्‍याला चार लाखाला गंडा

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

ट्रॅक्टर (Tractor) खरेदी-विक्रीच्या व्यवहारात एका शेतकर्‍याची चार लाख रूपयांची फसवणूक (Fraud) झाली आहे. या प्रकरणी संबंधीत शेतकर्‍याने (Farmer) येथील कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र ज्ञानदेव भांगीरे (रा. सोलणकरवाडी ता. माढा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल ( Filed a crime) झालेल्या आरोपीचे नाव आहे. शेतकरी प्रसाद चिंतामण हिंगे (वय 27 रा. खोडद गडाचीवाडी ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

शेतकरी हिंगे यांनी त्यांचे मित्र विजय रावसाहेब कराळे (रा. कापुरवाडी ता. नगर) यांच्या ओळखीतून 13 जानेवारी, 2022 रोजी रामचंद्र भांगीरे याला पाच लाख 80 हजार रूपये किंमतीला कुबोटा ट्रॅक्टरची विक्री केली होती. ठरल्या व्यवहारानुसार मार्केटयार्ड (Marketyard) येथे भांगीरे याने हिंगे यांना एक लाख 80 हजार रूपये कराळे यांचे समक्ष दिले. उर्वरित रक्कम व कागदपत्रांवर दोन दिवसांत खरेदी करू, असे सांगून भांगीरे ट्रॅक्टर घेऊन गेला.

दोन दिवसांनी तो उर्वरित चार लाख रूपयांची रक्कम घेऊन आला नाही. हिंगे यांनी त्याच्याशी वेळोवेळी संपर्क केला असता त्याचा फोन बंद येत होता. त्याचा घरी जाऊन शोध घेतला असता तो घरी देखील मिळून आला नाही. त्याने फसवणूक (Farud) केली असल्याचे हिंगे यांच्या लक्षात येताच त्यांनी सोमवार, 4 एप्रिल, 2022 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या