Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याकामगार संघटना टिकल्या पाहिजे - खा. शरद पवार

कामगार संघटना टिकल्या पाहिजे – खा. शरद पवार

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

महागाई व बेरोजगारी यासारखे महत्वाचे प्रश्न समोर उभे असून कामगार संघटना टिकल्या पाहिजे.असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

- Advertisement -

येथील इंडिया सिक्युरिटी व करन्सी नोटप्रेसच्या (India Security and Currency Notepress )मजदूर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंद मजदूर सभेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी खा. शरद पवार हे बोलत होते. याप्रसंगी खा. हेमंत गोडसे, माजी मंत्री छगन भुजबळ, हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजनसिंग सिद्धू, हिंद मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, आयएसपी मजदूर संघाचे अध्यक्ष जयवंतराव भोसले, हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, सिद्धार्थ पवार, हेमंत टकले, माजी महापौर अशोक दिवे, माजी जनरल सेक्रेटरी रामभाऊ जगताप, काँग्रेसचे आकाश छाजेड, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, रवींद्र पगार, निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, मनोहर कोरडे, जगन आगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खा. पवार म्हणाले की, कामगारांबाबत देशाचे चित्र बदलत असून एकेकाळी देशाची औद्योगीक राजधानी म्हणून मुंबईचे नाव होते. मात्र आता तसे राहिले नाही. मुंबई शहरात सुमारे ११५ गिरण्या होत्या. या गिरण्यांंतून भोंगा वाजला का मुंबईतील कष्टकरी कामगार गिरणीत घाम गाळायला जायचा. परंतु आता ना कामगार राहिला ना त्यांच्या चाळी राहिल्या. आता केवळ उंच इमारती दिसतात. पुर्वी मुंबईमध्ये हेलिकॉप्टरने जात असताना गिरण्यांच्या चिमण्या दिसायच्या आता इमारती दिसतात. एकूणच घाम गाळणारा कष्टकरी एव्हाना उध्वस्त झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सद्यस्थितीत देशात कामगारांच्या संघटना टिकल्या पाहिजे. याबाबतची आर्थिक नीती केंद्र सरकारने स्वीकारली असून त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा घणाघाती आरोप खा. पवार यांनी केंद्र सरकारवर केला. यापुढे कष्टकर्‍यांच्या घामाची किंमत मिळवून द्यायची आहे. महागाई व बेरोजगारी हे ज्वलंत प्रश्न महत्वाचे असताना सध्या धर्म आणि जातीमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे.हा काळ हा सोपा नाही तर जागा राहण्याचा आहे, असे म्हणून ते पुढे म्हणाले की, जगात अनेक कारखाने पाहिले, अनेक संस्था बघितल्या, परंतु सिक्युरिटी प्रेससारखा कारखाना नाही.

सध्या या प्रेसचे एकंदरीत कामकाज उल्लेखनिय असून ते केवळ येथील कष्टकरी कामगारांमुळे निर्माण झाले आहे. तुम्ही देशासाठी तसेच शेजारच्या देशाच्या नोटा छापण्याचे काम करतात, त्यामुळे प्रेस कामगारांचे भविष्य उज्वल आहे. मात्र त्यासाठी हिंद मजदूर संघाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे असून आमची साथ तुमच्या सोबत आहे, असे आश्वासन खा. पवार यांनी दिले.

यावेळी हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजनसिंग सिद्धू म्हणाले की, आज देशाची स्थिती गंभीर असून सध्या देशात सर्वाधिक बेरोजगारी आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे. जेव्हा कधी मजदूर लोकांवर हल्ला होतो, तेव्हा आपण शरद पवार यांच्याकडे जातो. मात्र यापुढे मजुरांवर हल्ला झाला, तर जशास तसे उत्तर मिळेल. आज स्वातंत्र्य असूनही गुलाम बनवले जात आहे. आम्हाला काम पाहिजे, जॉब सेक्युरिटी पाहिजे. यावेळी शरद पवार यांनी सर्व मजूर लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचे आवाहन सिद्धू यांनी केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

प्रारंभी प्रास्ताविकातून प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे म्हणाले की, कामगारांसाठी लढणारी देशात एकमेव संघटना म्हणजे हिंद मजदूर सभा आहे. संपूर्ण देशात मजदूर संघाचे ताकद मोठी आहे. हिंद मजदूर सभेच्या अमृत महोत्सवाची सुरूवात नाशिकमध्ये तर समारोप नागपूर येथे होणार आहे, ही राज्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. या प्रेसमध्ये केवळ एकच युनियन असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. मजदूर संघाच्या वतीने कामगारांच्या अनेक प्रश्नांना आम्ही वेळोवेळी न्याय दिला असून मयत कामगारांच्या वारसांना नोकरीत समाविष्ट करण्यासाठी आम्ही नेहमीच लढा दिला असून त्याला यशही मिळाले आहे. सर्वांनी एकजुटीने लढल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. देशात कामगारांची शक्ती मोठी आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी माजी छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे, प्रेस मजदूर संघाचे अध्यक्ष जयवंतराव भोसले, हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे आदींची समयोचित भाषणे झाले. सूत्रसंचालन राजेश टाकेकर यांनी केले. यशस्वीतेसाठी कार्तिक डांगे, अविनाश देवरूखकर, संदीप व्यवहारे, जयराम कोठुळे, प्रविण बनसोडे, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, इरफान शेख, नंदू कदम आदींनी परिश्रम घेतले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या