Wednesday, February 4, 2026
Homeजळगावदिलीप वाघ यांना व्यापार्‍यांचा प्रतिसाद

दिलीप वाघ यांना व्यापार्‍यांचा प्रतिसाद

पाचोरा । प्रतिनिधी
पाचोरा-भडगाव विधानसभेचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी 2024 च्या विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी प्रचाराचा गतिमान वेग घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. पाचोरा शहरामधील महाराणा प्रताप चौक, भडगाव रोड, विविध शॉपिंग कॉम्प्लेक्स,मार्केट कमिटी,स्टेशन रोड, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठ, भाजी मार्केट तसेच पाचोरा शहरातील सुवर्णपेठ म्हणून ओळख असलेल्या गांधी चौक इत्यादी महत्वपूर्ण भागात आपल्या प्रचार दौर्‍याचे नियोजन केले होते.

त्यांनी शहरातील सोन्याचे व्यापारी आणि सुवर्णपेढी यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. यावेळी, कापड, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी, हॉटेल, सुपर मार्केट, दुग्धजन्य पदार्थ व्यावसायिक, पुस्तक व जनरल स्टोअर्स अशा विविध व्यापारी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. व्यापारी बांधवांनी भविष्यातील आमदार म्हणून दिलीप वाघ यांनी पाचोरा शहरातील व्यापार व उद्योग व्यवसायांना गतिमान बनवून चालना द्यावी अशा शुभेच्छा देखील दिल्या.

- Advertisement -

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...