इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) भावली येथील धबधब्यालगत दरड कोसळून रस्त्यावर आल्याने सुमारे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. गुरुवार (दि.२५) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास भावली धरणालगत (Bhavali Dam) असलेल्या डोंगराच्या भागाची माती व दरड पिंप्रीसदो ते भंडारदराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोसळल्याने या परीसरातील वाहतुक बंद करण्यात आली हाेती. या घटनेत पर्यटकांची जास्त गर्दी नसल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
हे देखील वाचा : देवळाली मतदारसंघावर भगवा फडकवा; शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकरांचे आवाहन
पावसाचा जोर वाढत असल्याने डोंगरावर लहान मोठे धबधबे सुरू झाले असुन पाण्याच्या वाढत्या जोराने डोंगराची माती व झाडे कोसळत असतांना दरडही (Landslide) कोसळत आहे. या भागात जाणारे पर्यटक, ग्रामस्थांना, शाळकरी मुलांना या मार्गावरून जाण्यायेण्यास बंदी केल्याने अनेकांचा शहरात येण्याचा संपर्क दोन ते तीन तासांपासुन तुटला होता. तसेच या भागात विद्युत पुरवठाही खंडीत झाल्याने अनेक वाडया पाडया अंधारात असल्याने शालेय विद्यार्थी व चाकरमान्याचे हाल झाले.
हे देखील वाचा : Nashik News : महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; सोन्याचे मंगळसूत्र केले परत
दरम्यान, पावसाचा वाढता जोर व भावली धरण तुडूंब भरल्याने पर्यटकांना या भागात जाण्यास इगतपुरी पोलिसांनी (Igatpuri Police) बंदी केल्याच्या सुचना दिल्या आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी दिली. तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने त्वरित दरड हटविण्याची मोहीम राबवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा