भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी
ऐन नवरात्रोत्सवात (Navratri festival) रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) 66 रेल्वे गाड्या (66 railway trains) रद्द (cancelled) करण्याचा निर्णय (decision) घेतला आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या (South-East-Central Railway) बिलासपूर विभागातील (Bilaspur Division) रायगड आणि झारसुगुडा (Raigad and Jharsuguda) स्थानकांदरम्यान (between stations) चौथ्या मार्गाच्या बांधकामासाठी (construction of 4th avenue) 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत प्रीएनआय आणि एनआय (नॉन इंटरलॉकिंग) काम करण्यात येणार असल्याने रेल्वे गाड्या रद्दचा निर्णय घेण्यात आला. या सर्व गाड्या 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या वेगवेगळ्या तारखांना प्रभावित होतील.
असे आहे गाड्या रद्द झाल्याचे शेड्युल
12130 हावडा-पुणे,
12129 पुणे-हावडा,
12810 हावडा-सीएसएमटी,
12809 सीएसएमटी-हावडा या गाड्या 28 सप्टेंबरपर्यंत.
गाडी क्र. 12860 हावडा-सीएसएमटी 29 सप्टेंबरपर्यंत.
12859 सीएसएमटी-हावडा – 28 सप्टेंबरपर्यंत,
18030 शालीमार-एलटीटी 28 सप्टेंबरपर्यंत
18029 एलटीटी-शालीमार 28 सप्टेंबरपर्यंत,
22846 हटीया-पुणे – 23 व 26 सप्टेंबर रोजी.
22845 पुणे -हटिया 25 व 28 सप्टेंबर,
12880 भुवनेश्वर -एलटीटी – 26 व 29 सप्टेंबर,
12879 एलटीटी-भूवनेश्वर – 24, 28 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर रोजी.
12905 पोरबंदर -शालिमार – 28 व 29 सप्टेंबर रोजी.
22905 ओखा – शालीमार – 25 सप्टेंबर,
22906 शालीमार – ओखा 27 सप्टेंबर
13425 मालदा टाऊन – सुरत – 24 सप्टेंबर
13426 सुरत – मालदा टाऊन 26 सप्टेंबर,
12151 एलटीटी शालीमार – 28 सप्टेंबर,
12152 शालिमार-एलटीटी 23, 24 व 30 सप्टेंबर,
22894 हावडा-साईनगर शिर्डी – 29 सप्टेंबर,
22895 साईनगर शिर्डी-हावडा – 24 सप्टेंबर व 1 ऑक्टोंबर दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केेले आहे.