Friday, May 3, 2024
Homeनगरनेवासा-शेवगाव रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण

नेवासा-शेवगाव रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण

नेवासा | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील भेंडा येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून नेवासा तालुका किसान सभा व नेवासा तालुका काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला.

- Advertisement -

नेवासा ते शेवगाव महामार्गावर मोठं-मोठाली खड्डे पडली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. या खड्डयामुळे अनेक अपघात झाले आहेत. अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केल्याने नेवासा फाट्याकडून कुकाण्याकडे खड्डे भरण्याचे काम सुरू केले. मात्र हे काम अत्यन्त संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे. काल भरलेला खड्डा आज पुन्हा उखडलेला दिसून येत आहे.

महिन्यापासून सुरू असलेल्या खड्डे भरण्याचे कामाची गती वाढवावी,काम करणाऱ्या लोकांच्या टोळ्या वाढवून एकाच वेळी भानस हिवरे ते सौंदाळा, सौंदाळा ते भेंडा, भेंडा ते कुकाणा, कुकणा ते चिलेखनवाडी आणि नेवासा फाटा ते नेवासा, नेवासा ते पाचेगाव फाटा या हद्दीतील रस्त्याचे काम एकाच वेळी सुरू करून खड्डे बुजवावीत अशी मागणी करण्यात आली. या मागणी कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी भेंडा येथे बसस्थानक चौक परिसरात नेवासा-शेवगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात किसान सभा व काँग्रेसने वृक्षारोपण केले.

यावेळी किसान सभेचे नेते कॉ.बाबा आरगडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी माळवदे, कॉ.आप्पासाहेब वाबळे, कॉ.भारत आरगडे, वसंतराव फटांगडे, रामभाऊ पाउलबुद्धे, संजय फुलमाळी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या