Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात वृक्षांची होणार गणना

नाशकात वृक्षांची होणार गणना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील (Nashik Municipal Corporation area) वृक्षांची लवकरच गणना ( Counting of Trees )केली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंढे यांनी आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी चर्चा केली आहे. यापूर्वी नाशिक महपालिका हद्दीत 2016 साली वृक्षगणना करण्यात आली होती. त्यावेळी शहरात 49 लाख वृक्षांची नोंद झाली होती.

- Advertisement -

महाराष्ट्रात नाशिक शहराची ओळ्ख जशी येथील धार्मिक स्थळांमुळे आहे. तशीच ओळ्ख येथील हिरवाईमुळे शहराची ओळख आहे. दरम्यान शहरात किती संख्येने वृक्ष आहे, याची गणना दर पाच वर्षानी केली जाते. पालिकेच्या हद्दीत असलेल्या शासकीय, खासगी, सामाजिक संस्था व इतर ठिकाणी असणार्‍या वृक्षांची गणना करण्यात येते. करोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे ही वृक्षगणना रखडते की काय, अशी चर्चा होती. मात्र आता याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान वृक्षाची जातकुळी, त्याची उंची, घेर, त्याचे वयोमान, त्याला असणारे आजार या नोंदी घेण्याबरोबरच वृक्ष असणार्‍या ठिकाणांचे जिओ टॅगिंग पालिका करणार आहे. यापूर्वीच्या गणनेत शहरात सुबाभूळ, निलगिरी, आंबा, बाभूळ, कडूलिंब, अजाणवृक्ष, बोदरा, कॅशिया नोडासा, कुंभ, लाल जाम, मेडिसिंग, पाडळ या दुर्मिळ वृक्षासह विजयंती बाभूळ, चारोळी, कावस, शेंद्री, सुरंगी, विराग, असाना या वृक्ष आढळून आले होते.

एका झाडाच्या नोंदीकरिता म्हणजेच मोजण्याकरिता 8.55 रुपये खर्च आला होता. यासाठी 4 कोटी 18 लाखापर्यत खर्च पालिकेला लागला होता. वृक्ष गणना ही महापालिका न करता वृक्षासंबंधी काम करणार्‍या संस्थेला हे काम दिले जातेे. 2016 साली टेरीकॅटीन संस्थेला काम दिले होते. आता पुन्हा नव्याने यासाठी निविदा प्रसिध्द केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या