Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशEarthquake in Pakistan : भूकंपाच्या धक्क्यांनी राजधानी हादरली!

Earthquake in Pakistan : भूकंपाच्या धक्क्यांनी राजधानी हादरली!

दिल्ली | Delhi

- Advertisement -

भारताची राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. ५.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप होता. भूकंपाचे केंद्र पाकिस्तानातील कोरोरच्या दक्षिण-पश्चिम दिशेने २५ किमी अंतरावर होते. भूकंपाची खोली ३३ किमी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात गुरुवारी ५.८ तीव्रतेच्या भूकंपानंतर दिल्ली आणि उत्तर भारतातील बहुतेक भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानलाही भूकंपाचा धक्का बसला.

हे देखील वाचा : Maharashtra Weather : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

दोन आठवड्यांपूर्वी म्हणजे २९ ऑगस्ट रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ५.७ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्ताना होते.

हे देखील वाचा : Sanjay Raut : “संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

भूकंप का होतात?

जमिनीच्या आत होणाऱ्या हालचालींमुळे होणाऱ्या कंपनांमुळे होणारी स्थिती म्हणजे भूकंप असे म्हटता येईल. ही आपत्ती का उद्भवते हे जाणून घेण्यासाठी पृथ्वीची रचना समजून घेणे आवश्यक आहे. भूगर्भशास्त्रानुसार, पृथ्वी १२ टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत असतात. कधी-कधी प्लेट्स (खडक) एकमेकांवर आदळतात किंवा त्यांची टक्कर होते. या घर्षणामुळे तयार होणारी ऊर्जा जमिनीच्या वर आल्यामुळे भूकंपाचे धक्के बसतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या