Saturday, February 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजवैदू बांधवांच्या ज्ञानाचे लिखितस्वरूपात डॉक्युमेंटेशन होणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक...

वैदू बांधवांच्या ज्ञानाचे लिखितस्वरूपात डॉक्युमेंटेशन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

आदिवासी समाजाला गौरवशाली इतिहास आहे. समाजातील वैदू बांधव जंगलातील वनऔषधी वनस्पतीद्वारे विविध उपचार करतात. त्यांच्या ज्ञानाचे लिखितस्वरूपात डॉक्युमेंटेशन तयार करून प्रमाणपत्र देण्यात येईल. वैदू बांधवांना मानधन मिळावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

YouTube video player

कळवण शहरातील आप्पाश्री लॉन्स येथे शनिवारी(दि.२१) आदिवासी विकास विभागाकडून आयोजित ‘आदिवासी निसर्ग उपचार पध्दती व वनऔषधीचे महत्त्व’ याविषयावरील आदिवासी विकास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार नितीन पवार, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास आयुक्त गोपीचंद कदम, अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, कश्मिरा संखे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, एन. डी. गावित, अहिल्यानगर येथील बीजममाता ममता भांगरे आदी उपस्थित होते.

आदिवासी समाजात महिला उद्योजिका घडविण्यासाठी राणी दुर्गावती महिला सबलीकरण योजना राबविण्यात येत आहे. त्यामाध्यमातून रोजगार निर्मिती केली जाणार आहे. सध्या महिला बचतगट तयार करण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रकल्पस्तरावर एक शासकीय आश्रमशाळा ‘मॉडेल स्कुल’ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले. तर माजी केंद्रीय मंत्री डॉ. पवार व आमदार पवार यांनी मनोगत व्यक्त करताना निसर्ग संवर्धन गरजेचे असल्याचे सांगितले.

बीजमाता भांगरे यांनी पारंपरिक वाण आणि बियाणे यांचे जतन करण्याचे आवाहन केले. वैद्य चेतन भगत आणि दुर्गेश अंतापुरकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते वैदूभगत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाने परिषदेची रंगत वाढविली. शबरी नॅचरल्ससह विविध वनऔषधी विक्रीचे स्टॉलची मांडणी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदिवासी विकास आयुक्त कदम यांनी केले.

आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्ता वाढीला प्राधान्य
राज्यात 490 शासकीय आश्रमशाळा असून, या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी 1791 पात्रताधारक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्ता वाढीला प्राधान्य असल्याचे ना. डॉ. वुईके यांनी स्पष्ट केले.

असे आहेत वैदूभगत पुरस्कारार्थी
रघुनाथ जाधव (सुरगाणा), मधुकर महाडे (त्र्यंबकेश्वर), राजू वळवी, रघुनाथ लहारे (मोखाडा), सजन खुताडे, गंगा माळी, सोनू म्हसे (जव्हार), जीएस घुमरे (देवगिरी), राजकुमार गायकवाड (डहाणू).

ताज्या बातम्या

माझी वसुंधरा अभियान ४.० : चांदवडचा राज्यात तिसरा क्रमांक

0
चांदवड | प्रतिनिधी chandwad राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत चांदवड नगरपरिषदेला राज्यात तिसरा क्रमांक मिळाला असून नगरपरिषदेला दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले...