Friday, April 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभारत–ब्राझील सामंजस्य करार : पोलाद पुरवठा साखळी मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी नवे...

भारत–ब्राझील सामंजस्य करार : पोलाद पुरवठा साखळी मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी नवे पाऊल

दिल्ली | वृत्तसंस्था Delhi

- Advertisement -

भारत सरकारचे पोलाद मंत्रालय आणि ब्राझील संघराज्याच्या खाण आणि ऊर्जा मंत्रालयाने आज पोलाद क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या खाणकाम आणि खनिजांच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी एक सामंजस्य करार केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे हा सामंजस्य करार करण्यात आला.

हा सामंजस्य करार पोलाद मूल्य साखळीमध्ये द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी एक संस्थात्मक चौकट उपलब्ध करतो, ज्यामध्ये पोलाद उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख कच्च्या मालाच्या विश्वासार्ह आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.

सहकार्य यावर केंद्रित असेल:
पोलाद क्षेत्रातील शोध, खाणकाम आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक आकर्षित करणे
खनिजांवर प्रक्रिया आणि पुनर्वापर तंत्रज्ञान
स्वयंचलन तसेच अन्वेषण आणि खाणकामात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर
अन्वेषण प्रक्रिया वाढविण्यासाठी भूवैज्ञानिक डेटा विश्लेषणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
खनिज उत्खनन, प्रक्रिया आणि पर्यावरण व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धती

ब्राझील हा जगातील आघाडीच्या लोहखनिज उत्पादकांपैकी एक आहे आणि त्याच्याकडे पोलाद निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या खनिजांचे महत्त्वपूर्ण साठे आहेत, ज्यात मॅंगनीज, निकेल आणि निओबियम यांचा समावेश आहे. ब्राझीलसोबत वाढत्या सहकार्यामुळे भारताच्या पोलाद क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख कच्च्या मालाची आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता सुधारण्याची अपेक्षा आहे.

भारताची सध्या 218 दशलक्ष टन पोलाद निर्मिती क्षमता आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि औद्योगिकीकरणामुळे वाढत्या देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी, भारतीय कंपन्या पोलाद निर्मिती क्षमतेत लक्षणीय वाढ करत आहेत. या संदर्भात, हा सामंजस्य करार म्हणजे पोलाद उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या खनिज संसाधनांच्या विकासासाठी सहकार्य मजबूत करण्यासाठी, खनिज प्रक्रिया, लाभकारीकरण, पुनर्वापर आणि डेटा-चालित अन्वेषणात प्रगत तंत्रज्ञानाची उपलब्धता सुलभ करण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही भागीदारी पोलाद निर्मितीची कार्यक्षम तयारी करण्यास सहाय्यभूत ठरेल, पोलाद मूल्य साखळीमध्ये तंत्रज्ञान-नेतृत्व सुधारणा सक्षम करेल आणि भारत-ब्राझील पोलाद पुरवठा साखळीची लवचिकता आणि शाश्वतता मजबूत करेल.

ताज्या बातम्या

एकनाथ

Eknath Shinde: ठाकरेंच्या खासदारांसोबत खरच गुप्त बैठक झाली का? उपमुख्यमंत्री एकनाथ...

0
सातारा | Sataraमहाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी उलथापालथ होण्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन...