Wednesday, July 24, 2024
Homeनाशिकआदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक

आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

पत्नीचे (Wife) रोजंदारीवरील जुने पद पुन्हा नव्याने आदेश बदलून देण्याच्या कामाचे दहा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला (Assistant Project Officer) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau) पथकाने सापळा रचत अटक (Arrested) केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांच्या पत्नीचे रोजंदारीवरील पद स्वयंपाकी ऐवजी सफाईगार असे आदेश काढले होते. ते कामाठी किंवा स्वयंपाकी असे नव्याने आदेश बदलून देण्याच्या कामाच्या बदल्यात प्रताप नागनाथ वडजे (Pratap Nagnath Wadje) (५४) (सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण, नाशिक) याने दहा हजार रुपयांची लाच (Bribe) मागितली होती.

दरम्यान, यावरून तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली असता पोलीस अधीक्षक सुनील कडासने (Sunil Kadasane) अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक उपाधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक जाधव, राजेश गीते, शरद हेंबाडे ,संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने सापळा रचत संशयित वडजे याला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या