Sunday, May 19, 2024
Homeनाशिकनेताजी सुभाषचंद्र बोस यांना रांगोळीच्या माध्यमातून अभिवादन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना रांगोळीच्या माध्यमातून अभिवादन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे Netaji Subhash Chandra Bose Jayanti औचित्य साधून,संस्कार भारती Sanskarbharti ,नाशिक महानगरने नेताजींच्या कार्याचा गौरव करणारी रांगोळी Rangoli रेखाटली आहे.

- Advertisement -

नेताजींच्या 125 व्या जयंतीपासून,भारत सरकारने निश्चित केलेल्या ‘पराक्रमदिनाचा’ Parakaramdin उल्लेख या रांगोळीत ठळकपणे करण्यात आला आहे. तसेच आझादहिंद सेना,आझाद हिंद सेनेचा ध्वज रेखाटण्यात आला आहे.

ही रांगोळी 8 x 12 फूट असून 6 कलाकारांनी 3 तासात रेखाटली आहे.करोनाचे नियम पाहता ही रांगोळी ऑनलाईनलाईन स्वरुपातच पहाता येईल.

या रांगोळीची संकल्पना संस्कार भारती भूअलंकरणविधा संयोजक,निलेश देशपांडे यांची आहे. वीणा गायधनी,भारती सोनवणे, मंजूषा नेरकर, सुजाता कापूरे,सीमा पाठक,यांनी रांगोळी रेखाटनात मदत केली. संस्कार भारतीचे रवींद्र बेडेकर,तसेच चैतन्य गायधनी ,प्रसाद देशपांडे यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या