Friday, January 17, 2025
HomeनाशिकTrimbakeshwar News : सोमवती अमावस्यानिमित्त त्र्यंबकनगरी भाविकांच्या गर्दीने फुलली

Trimbakeshwar News : सोमवती अमावस्यानिमित्त त्र्यंबकनगरी भाविकांच्या गर्दीने फुलली

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

येथे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाविकांची (Devotees) मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे.अशातच आज सोमवती अमावस्या (Somvati Amavasya) असल्याने त्र्यंबकनगरी भाविकांच्या गर्दीने (Crowd) फुलून गेल्याचे पाहायला मिळाले…

- Advertisement -

Trimbakeshwar News : दुगारवाडी धबधब्यात पर्यटक गेला वाहून; शोधमोहीम सुरू

यावेळी भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी मंदिराच्या पूर्व दरवाजाकडे भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे चित्र त्र्यंबकमध्ये दिसत आहे. तसेच अनेक भाविकांनी आज सकाळी कुशावर्तावर (Kushavarta) स्नानासाठी गर्दी केली होती. याशिवाय अनेकांनी पूजाविधी करून दानधर्म देखील केले. तर काही भाविकांनी पूजाविधी करून देवाकडे संकटे दूर व्हावी अशी प्रार्थना देखील केली.

Nashik News : देवळालीत बिबट्या जेरबंद

दरम्यान, दुसरीकडे पूर्व दरवाजा परिसर, शिवनेरी धर्मशाळेसह आजूबाजूच्या परिसरात मोठी अस्वच्छता असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाढणाऱ्या आजारांबद्दल (illness) चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या