Friday, May 3, 2024
Homeनाशिकश्रावणात त्र्यंबकेश्वराच्या आॅनलाईन दर्शन सुविधेबाबत चाचपणी

श्रावणात त्र्यंबकेश्वराच्या आॅनलाईन दर्शन सुविधेबाबत चाचपणी

नाशिक । प्रतिनिधी

श्रावण महिन्याला येत्या मंगळवारपासून (दि.२१) प्रारंभ होत असून करोनामुळे मंदिर बंद असल्याने यंदा भाविकांना बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेता येणार नाही.

- Advertisement -

मात्र, मंदिर प्रशासनाशी बोलून भाविकांना आॅनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देता येईल का याबाबत चाचपणी सुरु आहे. याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे मंदिर प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे.

श्र‍ावणात त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांची मंदिरात मोठी गर्दी होते. श्रावणी सोमवारी दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वरी नतमस्तक होतात. यंदा मात्र करोनामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार नाही.

देशातील इतर मंदिरांप्रमाणे त्र्यंबकेश्वराचे मंदिर भाविकांसाठी बंद आहे. नित्य नियमित पूजा व विधीपाठ वगळता इतर सर्व बाबींवर बंदी आहे. मात्र श्रावणात विशेषत: सोमवारी भाविकांना त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेता यावे यासाठी आॅनलाईन दर्शनाचा पर्याय उपलब्ध आहे.

जेणेकरुन भाविक देशाच्या कोणत्याही कोपर्‍यात असले तरी घरबसल्या दर्शनाचा लाभ घेणे शक्य होईल. हा पर्याय विचारधीन असून जिल्हा प्रशासन त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाशी चर्चा करणार आहे.

यंदा तिसरी फेरी नाही

श्रावणात तिसर्‍या सोमवारचे विशेष महत्व असते. ब्रह्मगिरिला फेरी मारण्याची परंपरा आहे. दरवर्षी हजारो शिवभक्त ही फेरी मारतात. यंदा मात्र करोनामुळे मंदिर बंद असून फेरी होणार नाही हे उघड आहे.

श्रावणात त्र्यंबकेश्वराचे आॅनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या पर्यायावर मंदिर प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेऊ.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या