नाशिक | Nashik
जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat) काल उत्साहात मतदान पार पडले. त्यानंतर आज निकाल जाहीर होत आहे…
यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) ५७ ग्रामपंचायतींसाठी ८३.०६ टक्के मतदान झाले होते. यात एकूण ७१६६८ मतदारांपैकी ५९४९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीस सुरुवात झाली असून निकाल जाहीर होत आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रतन खोडे तर माळेगाव सरपंचपदी वंदना गोरख दिवे निवडून आले आहेत. तसेच वेळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी देवचंद पाटील हे निवडून आले आहेत.
तर पेगलवाडीच्या (त्र्यं) सरपंचपदी विलास आचारी यांची तर सामुंडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक गवारी हे विजयी झाले आहेत. तर तळेगाव काचुर्लीच्या सरपंचपदी नारायण पारधी निवडून आले आहेत. धुमोडीच्या सरपंचपदी वाळू चिंतामण आहेर हे निवडून आले आहेत. तर वार्ड क्रमांक २ मधून सदस्यपदी मुक्ता निवृत्ती आहेर या निवडून आल्या आहेत.
तसेच तळवाडेच्या सरपंचपदी विठाबाई केरू आहेर तर तोरंगणच्या सरपंचपदी राहुल बोरसे तर झारवड खुर्दच्या सरपंचपदी संदीप जाधव विजयी झाले आहेत.