Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशWest Bengal assembly election results : कलानुसार बंगालमध्ये तृणमूलला बहुमत, मात्र...

West Bengal assembly election results : कलानुसार बंगालमध्ये तृणमूलला बहुमत, मात्र ममता पिछाडीवर

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकालाच्या मतमोजणीचे कल हाती आले आहे. बंगालमध्ये लक्ष लागून असलेल्या नंदुग्राममध्ये पहिल्या तीन फेरीत शुभेंदू अधिकारी आघाडीवर आहे. तिसऱ्या फेरीत ही आघाडी ८ हजार मतांवर गेली. परंतु तृणमूल काँग्रेसने १५० जागांवर आघाडी घेत बहुमताचा टप्पा पार केला आहे. भाजपा १२० जागांवर आहे. २७६ जागांचे निकाल हाती आले आहे.

Assam Election Results आसाममध्ये भाजप परतणार ?

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत. बहुमतासाठी १४८ चा जादूई आकडा गाठावा लागणार आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने २११ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला ४४, डाव्या पक्षांना २६ आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

पश्चिम बंगाल निवडणुकीवर सर्वांचे लक्ष आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि ममता बॅनर्जींनी देखील नरेंद्र मोदी-अमित शाह यांना जोरदार टक्कर दिल्यामुळे पश्चिम बंगालमधील निवडणूक चर्चेचा विषय ठरली. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार का हे १ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या