Sunday, May 19, 2024
HomeधुळेPhotos # मेथीनजीक तिहेरी अपघात, दोंडाईच्यातील एक तर मेथीतील दोन जण ठार

Photos # मेथीनजीक तिहेरी अपघात, दोंडाईच्यातील एक तर मेथीतील दोन जण ठार

दोंडाईचा- Dondaica (श. प्र.)

मेथी (Methin) ता.शिंदखेडा जवळील अमोल ढाब्यावर जवळ आज रात्री 8 वाजेच्या सुमारास ट्रक, दुचाकी व ट्रॅक्टरचा (truck, bike and tractor) तिहेरी अपघात (Triple accident) झाला. या अपघातात हर्षल ठाकूर (रा. महादेवपुरा, दोंडाईचा) हा जागेवर ठार झाला. तर ट्रॅक्टर वरील मेथी येथील आनंदसिंग भीमसिंग गिरासे (वय 32) व सखाराम बाबुराव भिल (अहिरे)( वय 25) दोघेही गंभीर जखमी झाले होते.

- Advertisement -

त्यांना स्थानिकांनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना वैद्यकीय अधिकारी अमोल भामरे व डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी तपासून मृत घोषित केले. एम 18 बी जी 6398 ही ट्रक, ट्रॅक्टर व मोटरसायकल हे तीनही धुळ्याकडून दोंडाईचाच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली आहे. या तिहेरी विचित्र अपघातात तीन जण मृत्यमुखी पडल्याने मेथी, दोंडाईचासह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळतात शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड पोलिस कर्मचाऱ्यांचा दाखल झाले होते

- Advertisment -

ताज्या बातम्या