कर्जत |प्रतिनिधी| Karjat
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देणार्या टवाळखोरांना समजावून सांगितल्याचा राग आल्याने मुलीच्या पित्यासह, मुलीवर हल्ला करण्याचा प्रकारातील तिघांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.
अमोल दादा दानवले (रा. राशीन) हा निर्भयास त्रास देत होता. याबाबत निर्भयाने कुटुंबीयांनाही माहिती दिली होती. मात्र, कुटुंबाची बदनामी होऊ नये, म्हणून तिने पोलिसांत तक्रार दिली नव्हती. आरोपी दानवले व त्याचे मित्र गणेश हौसराव सुरवसे, मुरलीधर सायकर, केतन गायकवाड सर्व (रा.राशीन) हे सर्व वेळोवेळी मुलीचा पाठलाग करत होते.
गर्दीचा फायदा घेत अमोल दानवले याने मुलीचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी समजावून सांगणार्या मुलीच्या वडिलांना आरोपी गणेश सुरवसे याने चाकू पोटात मारून आणि निर्भयाच्या उजव्या हाताच्या दंडावर चाकू मारून तिलाही दुखापत केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघा आरोपींना कर्जत पोलिसांनी जेेरबंद केले आहे.