Monday, October 14, 2024
Homeनगरट्रकची मोटारसायकलला धडक; महिला ठार तर एक जखमी

ट्रकची मोटारसायकलला धडक; महिला ठार तर एक जखमी

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा (Newasa) तालुक्यातील गणेशवाडी येथे सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास गणेशवाडी येथून सोनईकडे निघालेल्या ट्रकने मोटारसायकलला समोरुन दिलेल्या धडकेत (Truck and Bike Accident) एक ठार तर एक जखमी झाले आहे.

- Advertisement -

या अपघातात राधाकिसन सोन्याबापु पालवे हे जखमी (Injured) झाले तर त्यांच्या सुनबाई शिला बाळासाहेब पालवे ह्या जागेवर ठार (Death) झाल्या. सदर अपघातातील ट्रक सोनई पोलीसांनी (Sonai Police) ग्रामस्थांच्या मदतीने ताब्यात घेतला. सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या