Wednesday, August 19, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 225 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) बाजार समितीत 7373 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 3600 ते 5000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2300 ते 3550 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1000 ते 2250 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 1500 ते 3500 रुपये. जोड कांदा 700 ते 1600 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 7862 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 171 ते 225 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 101 रुपये ते 170 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 17 क्रेट्सची आवक झाली. पेरूला प्रतिकिलोला 22 ते 45 रुपये तर सरासरी 35 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची (Dragon Fruit) 43 क्रेट्सची आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला 35 ते 58 रुपये तर सरासरी 45 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला.

ताज्या बातम्या

राज्यात २८ ऑगस्टपासून धर्मस्वातंत्र्य कायद्याची अंमलबजावणी; गृह विभागाकडून अधिसूचना जारी

0
मुंबई | प्रतिनिधीराज्यात सक्तीचे, फसवणुकीचे अथवा बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ ची अंमलबजावणी येत्या २८ ऑगस्टपासून होणार आहे. गृह विभागाने मंगळवारी यासंदर्भातील...