Friday, May 3, 2024
Homeनगरशिर्डीत पोहचण्याआधीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात!

शिर्डीत पोहचण्याआधीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात!

अहमदनगर (प्रतिनिधी)-

शिर्डी संस्थाने लावलेल्या ‘ड्रेसकोड’ फलकावरून वाद निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी घेत नगर पोलिसांनी तृप्ती देसाई यांना सुपा टोल नाक्यावरच ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस आणि भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

- Advertisement -

भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करून भाविकांनी दर्शन घ्यावे असा फलक शिर्डी संस्थानने लावला आहे. त्याला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला आहे. हा बोर्ड संस्थाने काढावा अन्यथा आपण येवून तो फलक काढू असा इशारा देसाई यांनी दिला होता. त्यानंतर शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी देसाई यांना शिर्डीत मनाई करणारी नोटीस बजावली. या नोटीसमुळे देसाई आणखीच संतप्त झाल्या आणि त्यांनी शिर्डीत येणारच अशी घोषणा केली.

घोषणेनुसार देसाई व त्यांच्या कार्यकर्त्या या शिर्डीत येण्यास निघाल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी नगर-पुणे रोडवरील सुपा टोल नाका परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला. देसाई यांची कार येताच पोलिसांनी अडविली. त्यानंतर देसाई यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी पोलीस आणि भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी म्हणून देसाई यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांची कारवाई ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. फलक लावणार्‍या शिर्डी संस्थानवर कारवाई झाली पाहिजे.

तृप्ती देसाई, अध्यक्ष, भूमाता ब्रिगेड

- Advertisment -

ताज्या बातम्या