इस्तंबूल
तुर्कीमध्ये मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. हा साठा त्या देशाच्या सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) पेक्षा मोठा आहे. ४३ हजार ८०० कोटी रुपये या साठ्याची किंमत आहे.
सोनाचा याखाणीचा शोध फाहरेटिन पाईराज या व्यक्तीने लावला आहे. ते तुर्कीमधील अॅग्रीकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्स या संस्थेचे प्रमुख आहेत. या खाणीत ९९ टन जवळपास ८९ हजार ८११ किलो सोन्याचा साठा सापडला आहे. या सोन्याची किंमत सहा बिलियन डॉलर म्हणजे ६०० कोटी डॉलर म्हणजेच ४३ हजार ८०० कोटी रुपये आहे. ही रक्कम अनेक देशांच्या राष्ट्रीय सखल उत्तपन्नापेक्षाही अनेक पटींने अधिक आहे. २०२० मध्ये टर्कीने ३८ टन सोन्याचे उत्पादन घेतले आहे. एका स्थानिक वृत्तसंस्थेशी संवाद साधताना पाईराज यांनी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही या साठ्यापैकी काही भाग खोदकाम करुन यशस्वीपणे वर काढू असा विश्वास व्यक्त केला आहे.