Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशTurkey Syria Earthquake : भूकंपानंतर तुर्की-सीरियात मृत्यूचे तांडव सुरूच! मृतांचा आकडा २४०००...

Turkey Syria Earthquake : भूकंपानंतर तुर्की-सीरियात मृत्यूचे तांडव सुरूच! मृतांचा आकडा २४००० पार

दिल्ली | Delhi

तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मृतांचा आकडा सतत वाढत आहे. भूकंपामुळे आतापर्यंत २४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जसजसे कोसळलेल्या घरांचा ढिगारे हटवले जात असताना त्याखालून मृतदेह बाहेर येत आहेत.

- Advertisement -

दरम्यान भूकंपानंतरही संकटकांचा डोंगर काही कमी होत नाही, एकीकडे पोटभर अन्नाची भ्रांत तर दुसरीकडे जीवघेण्या थंडीमुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतो. यात मृतांचा संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Turkey and Syria Earthquake : तुर्की-सीरियातील विध्वंसाने किल्लारीच्या ‘त्‍या’ कटू आठवणी पुन्हा ताज्या

तुर्कीतील सनलिऊर्फा, मलेटिया, अदाना, कहमानमारश, हैटी, गाजिएनटेप, ओस्मानिये, अदियामान आणि किलीस या शहरांमध्ये भूकंपामुळं सर्वात जास्त जीवीत आणि वित्त हानी झालेली आहे. जेसीबी आणि मोठमोठ्या क्रेन्सच्या सहाय्यानं पडलेल्या इमारतींचा मलबा हटवण्याचं काम जारी आहे. तुर्कीसह सीरियामध्येही भूकंपामुळं मृतांचा आकडा वाढतोच आहे.

Turkey Syria Earthquake : चिमुकलीचे अंग धुळीनं माखलेलं, काहीशी भेदरलेली; ढिगाऱ्याखालून बाहेर काढताच….

तुर्कस्तान-सिरियातील एक कोटी ३५ लाखांहून अधिक नागरिकांना या भूकंपाचा फटका बसला आहे. काही शहरांच्या रस्त्यांवर पांघरूण, गालिचे व कापडांत गुंडाळलेले मृतदेह पडले आहेत. शवागार व स्मशानभूमीवरही ताण वाढला आहे. या भागातील तापमान गोठणबिंदूच्या खाली आहे.

Turkey Earthquake : फुटबॉलविश्वात शोककळा! विनाशकारी भूकंपात तुर्कीच्या गोलकीपरचा मृत्यू

जगभरातील देशांतील मदत आणि बचाव पथकं भूकंपबाधित भागात पोहचतं आहेत. यात भारताने मदतीसाठी ऑपरेशन दोस्त नावाने एक मोहिम सुरु केली आहे. यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत म्हटले की, भूकंपग्रस्त तुर्कस्तानमध्ये मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारतीय पथके रात्रंदिवस काम करत आहेत. जास्तीत जास्त जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत राहतील. या कठीण काळात भारत तुर्कस्तानच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या