Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशTurkey-Syria Earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये मृत्यूतांडव! मृतांची संख्या २१ हजार पार

Turkey-Syria Earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये मृत्यूतांडव! मृतांची संख्या २१ हजार पार

दिल्ली | Delhi

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठा भुकंप झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. भूकंपाची तीव्रता खूप जास्त असल्याने इमारतींच्या मलबे एकापाठोपाठ एक कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. हजारोंच्या संख्येत नागरिक इमारतीच्या ढीगाऱ्यात अडकल्याने सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या भूकंपामुळे आत्तापर्यंत २१ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कडाक्याची थंडीमुळे मदत आणि बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे भूकंपाच्या ९० तासांनंतरही मृत्यू तांडव सुरु आहे.

कोसळलेल्या इमारतींचा ढिगारा जसजसा बाजूला काढला जातोय, तसतसे मृतदेह बाहेर काढले जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले लोकं वाचण्याची शक्यता कमी होत आहे. कारण रात्रीचे तापमान शून्याच्या खाली गेल्याने मदतकार्य थांबवावे लागत आहेत.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्यांच्या लोकांच्या मदतीसाठी जगातील अनेक देश पुढे आले आहेत. आतापर्यंत ७० हून अधिक देश यासाठी पुढे आले आहेत. जागतिक बँकेने तुर्कीला १.७८ बिलीयन डॉलर्सचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. अनेक देशांनी या देशांना मदत सामग्रीही पाठवली आहे. अमेरिकेने दोन्ही देशांना ८५ मिलीयन डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी भारताने मदतीचा हात दिला आहे. ‘ऑपरेशन दोस्त’द्वारे (Operation Dost) भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे. भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन पथकांना विशेषत: श्वानपथक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक उपकरणांसह भारतातून तुर्कीला पाठवण्यात आलं आहे.

NDRF ची पथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसत आहेत. तुर्कस्तानमधील हताया (Hatay) येथे भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या