Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशह्रदयद्रावक! एकाचवेळी तब्बल १२ काळविटांचा मृत्यू... नेमकं काय घडलं?

ह्रदयद्रावक! एकाचवेळी तब्बल १२ काळविटांचा मृत्यू… नेमकं काय घडलं?

सोलापूर | Solapur

उड्डाणपुलावरून हरणांचा कळप खाली कोसळून त्यात एकाचवेळी तब्बल १२ काळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापूर-पुणे महामार्गावर शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेला वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरालगतच्या शिवाजी नगर परिसरात हिरजच्या माळरानावरून काळवीटांचा कळप येत होता. यावेळी माघून येणाऱ्या वाहनाला आणि कुत्र्याला घाबरून या कळपाने उड्डाण पुलावरून खाली उडी मारली, यात १२ कळवीट जागीच दगावली.

माझे बाबा मला मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात; चिमुकल्याच्या ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

शनिवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी तात्काळ वन विभागाला सदर घटनेची माहिती देताच उपवनसंरभक धैर्यशिल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली, यानंतर जखमी काळवीटांना तातडीने उपचारांसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातामुळे पुन्हा एकदा वन्यजीवांच्या या दुर्दैवी मृत्यूसाठी कोणाला जबाबदार धरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

VIDEO : रुग्णालयात अग्नितांडव! किंचाळ्या, लोक सैरावैरा धावले; डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा होरपळून मृत्यूIAF Planes Crash : एकाच दिवशी वायुसेनेच्या 2 विमानांचा अपघात

- Advertisment -

ताज्या बातम्या