Thursday, May 2, 2024
Homeनगरबाभळेश्वर येथे दोन एकर ऊस जळाला

बाभळेश्वर येथे दोन एकर ऊस जळाला

बाभळेश्वर (वार्ताहर) –

राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील तुषार संजय म्हस्के व अभिषेक राजेंद्र म्हस्के यांच्या मालकीच्या गट नंबर 159 येथील

- Advertisement -

दोन एकर ऊस शॉटसर्किटने जळाला.

याबाबत माहिती अशी की, बाभळेश्वर येथील शेतकरी तुषार संजय म्हस्के व अभिषेक राजेंद्र म्हस्के यांच्या गट नंबर 159 ही शेती बाभळेश्वर सबस्टेशनच्या मागील बाजूस आहे. याठिकाणी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात टॉवर्स लाईन गेल्या आहेत. तसेच याठिकाणी शेती लाईन सुद्धा आहे. याठिकाणी टॉवर्स लाईनच्या आगीच्या लोळामुळे या उसाला आग लागली.

परिसरातील नागरिकांनी विखे कारखान्याच्या अग्निशामक दलास फोन केला. तोपर्यंत नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. अग्निशमन आल्यानंतर आग आटोक्यात आणली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बराच ऊस यात जळाला. तसेच या बरोबर ठिबक सिंचन सहीत सर्व साहित्य जळून गेले. यात सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या प्रकारामुळे शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण आहे. तरी महावितरणने झोळ असणार्‍या ठिकाणी दुरूस्ती करून घ्यावी. म्हणजे अशा घटना होणार नाहीत. या घटनेचा तलाठ्याने पंचनामा केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या