Thursday, May 2, 2024
Homeनगरबिबट्याच्या कातड्याची तस्करी करणारे दोघे अटकेत

बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणारे दोघे अटकेत

अहमदनगर (प्रतिनिधी) –

बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणारे दोघे शिक्रापूर पोलिसांनी गजाआड केले. हे दोघे आरोपी नगर जिल्ह्यातील

- Advertisement -

पारनेर तालुक्यातील आहेत.

बिबट्याची कातडी दोन इसम घेऊनयेत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांा माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखली शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पो. ह. सहदेव ठुबे, शेख, पो.ना. सचिन मोरे, संतोष शिंदे यांच्यासह पथकाने सापळा लावला असता त्या ठिकाणी दोन संशयित युवक दुचाकीहून आले असता या पोलिसांना दिसून आले.

त्यावेळी पोलिसांच्या पथकाने त्या युवकांच्या जवळील असलेल्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये काळे टिपके असलेले बिबट्याचे कातडे मिळून आले. यावेळी पोलिसांनी त्या युवकांना ताबायात घेत त्यांच्या कडून अंदाजे 10 लाख रूपये किमतीचे बिबट्याचे कातडे गजप्त केले असून पोलिसांनी दत्तात्रय देवराम शिंदे (रा. पळवे, ता. पारनेर, जि. अ.नगर), व दादासाहेब रामदास थोरात (रा. चाळवणे, ता. पारनेर. सध्या रा. शिरूर) या दोघांवर वन्य जीव अधिनियमन अंतर्गत गुन्हे दाखल केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या