Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारपातोंडा शिवारात दोन घरफोड्या,दिड लाखाचा ऐवज लंपास

पातोंडा शिवारात दोन घरफोड्या,दिड लाखाचा ऐवज लंपास

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

तालुक्यातील पातोंडा शिवारात (Patonda Shivara) श्रीजी पार्कमध्ये एकाच दिवशी चोरट्यांनी (thieves) दोन धाडसी घरफोड्या (burglary) करुन सुमारे दिड लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

- Advertisement -

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार तालुक्यातील पातोंडा शिवारातील (Patonda Shivara) श्रीजी पार्कमध्ये राहणारे चेतन हर्षद जोशी व पवन विजय येपुरे यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला टाकला .चेतन जोशी यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडुन आत प्रवेश करीत चोरट्यांनी (thieves) 50 हजाराची रोकड, 60 हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ,20 हजार रुपये किंमतीची सोन्याची कानातील कर्णफुली असा एकूण 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला आहे .

त्यानंतर चोरट्यांनी (thieves) पवन विजय येपुरे यांच्या घराकडे मोर्चा वळवुन दरवाजाचा कडीकोंडा तोडला . तसेच कपाटातील लॉकर तोड़न 14 हजाराची रोकड, 4 हजार रुपये किंमतीचे 1 ग्रॅम सोन्याची अंगठी व ओम पान अर्धा ग्रॅम असे एकुण 18 हजार किंमतीचा मुद्देमाल लांबविला . दोन्ही घरफोड्या करुन चोरट्यांनी 1 लाख 48 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे . याबाबत चेतन हर्षद जोशी यांनी नंदुरबार उपनगर पोलीस (police) ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार अनोळखी चोरट्यांविरुध्द भादंवि कलम 457 , 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत .

- Advertisment -

ताज्या बातम्या