Tuesday, August 25, 2026
HomeनगरAhilyanagar : दोन मुलांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू

Ahilyanagar : दोन मुलांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू

दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा

लोणी |वार्ताहर| Loni

कुटुंबीया सोबत शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून दुदैवी (Two Child Drowning Death) अंत झाला. दोघे चुलत भाऊ होते. ही घटना राहाता (Rahata) तालुक्यातील गोगलगाव येथे बुधवारी घडली असून गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती अशी, गोगलगाव (Gogalgav) येथे वस्तीवर राहणारे दत्तात्रय व नारायण चौधरी हे दोघे भाऊ शेती व्यवसाय करतात. दत्तात्रय हे खासगी वायरमन म्हणूनही काम करतात. बुधवारी दुपारी शेतात खत टाकण्यासाठी साहिल दत्तात्रय चौधरी (वय 19) व किरण नारायण चौधरी (वय 14) हे चुलत भाऊ कुटुंबियांसोबत गेले होते.

- Advertisement -

खत टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर साहिल व किरण हे हात-पाय धुण्यासाठी जवळच्या ओढ्यावर (Stream) गेले. सध्या निळवंडे धरणातून (Nilwande Dam) तळे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. डाक तलावात पाणी सोडण्यासाठी ओढ्याचे खोलीकरण करण्यात आलेले आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही मुलांचा पाय घसरून ते ओढ्याच्या पाण्यात बुडाले. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून दोघांना बाहेर काढले पण त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना प्रवरा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

किरण हा नुकताच आठवी इयत्ता उत्तीर्ण झाला होता तर साहिल लोणी (Loni) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकत होता. या घटनेची माहिती मिळताच गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. चौधरी कुटुंबाला धीर देण्यासाठी अनेक नातेवाईक पोहचले. प्रवरा रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी गोगलगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्या

default-featured-image

Bhaskar Bhagare : रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराचा पैसा ‘लाडकी बहीण’साठी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आदिवासी समाजाच्या विकासासाठी राखीव असलेला निधी (Funds) अन्य योजनांकडे वळवून सरकारने आदिवासी बांधवांच्या हक्कांवर अन्याय केला आहे. आदिवासी उपयोजनेतील निधी...