Friday, May 3, 2024
Homeजळगावसंक्रातीला चटका लावणाऱ्या घटना ; जळगावात दोन मुलांनी गमावला प्राण

संक्रातीला चटका लावणाऱ्या घटना ; जळगावात दोन मुलांनी गमावला प्राण

जळगाव – jalgaon

जळगावमध्ये पतंगामुळे दोन किशोरवयीन मुलांनी प्राण गमावल्याच्या चटका लावणाऱ्या दोन वेगवेगवेगळ्या ऐन मकरसंक्राती दिवशी घटना घडल्या.

- Advertisement -

पहिल्या घटनेत पतंग उडवण्यासाठी जावू दिले नाही म्हणून एका 12 वर्षांच्या मुलाने चक्क गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेमध्ये एका 10 वर्षांच्या मुलाला पतंग काढताना विजेचा धक्का लागल्याने जीव गमावावा लागला. त्यामुळे पंचक्रोशीत एकच खळबळ आहे.

जळगावमध्येच दुसरी एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यात मोकळ्या मैदानात पतंग उडवताना एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मकरसंक्रांतीनिमित्त पंतगोत्सव रंगला होता. मोकळ्या मैदानात काटाकाटी सुरू होती. तितक्यात एका मुलाचा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकला. हा पतंग काढण्याचा प्रयत्न करताना दहा वर्षांच्या मुलाला विजेचा शॉक लागला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी या मुलाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर यांनी मृत घोषित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या