Friday, May 3, 2024
Homeनगरदोघे सराईत गुन्हेगार अटकेत

दोघे सराईत गुन्हेगार अटकेत

अहमदनगर (प्रतिनिधी) –

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना पोलीसांनी पाठलाग करत अटक केली असून चौघे पसार

- Advertisement -

झाले आहेत. नगरच्या एलसीबीने राहाता येथील गणेशनगर भागात बुधवारी रात्री ही कारवाई केली. त्यांच्याकडून दोन मोटरसायकलींसह 71 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून जप्त केलेल्या मोटरसायकली चोरीच्या निघाल्या असल्याची माहिती पी आय अनील कटके यांनी दिली.
शुभम अनिल काळे, भरत उर्फ भुऱ्या तात्याजी काळे (दोघेही रा. गणेशनगर, राहता) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. आनंद अनिल काळे, अक्षय यशवंत आव्हाड, गणेश भिकाजी तेलोरे ( तिघेही रा. गणेशनगर) असे पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीने पाथर्डी तालुक्यातील जबरी चोरीची कबुली दिली आहे.

बुलेट, पल्सर मोटरसायकली, मोबाईल, गलोल, मिरचीपूड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गणेशनगर परिसरातील वाकडी-गोटेवाडी रोडवर दरोडेखोरांची टोळी दबा धरून बसल्याची माहिती खबऱ्याकडून पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यांनी पथकाला सूचना देत कारवाईचे आदेश दिले. पथक वाकडी रोडवर पोहोचले त्यावेळी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सहाजण कुजबुज करत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच ते पळाले. मात्र पोलिस पथकाने पाठलाग करत दोघांना पकडले, तर अन्य चौघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी जप्त केलेल्या मोटरसायकली चोरीच्या निघाल्या. बुलेट औरंगाबादच्या वाळूंज परिसरातून, तर पल्सर नेवासा तालुक्यातून चोरी केल्याची कबुली अटकेतील दोघांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे यांच्या टीममधील पोलीस नाईक संतोष लोंढे, शंकर चौधरी, प्रकाश वाघ, संदीप दरंदले विनोद मासाळकर, राहुल सोळुंके, रोहित मिसाळ, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
…..
शुभम भरतची गुन्हेगारी हिस्टरी

शुभम काळे आणि भरत काळे हे दोघे अट्टल गुन्हेगार आहेत. शुभम काळे विरोधात 10, तर भरतविरोधात आठ गुन्हे दाखल आहेत. औरंगाबाद, नाशिक, नेवासा, शिर्डी, कोपरगाव, लोणी, राहाता, श्रीरामपूर, सिन्नर, निफाड, कोतवाली पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा असे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या