Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रDombivli MIDC Blast : डोंबिवलीमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

डोंबिवलीतील (Dombivli) एमआयडीसी (MIDC) भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठा भीषण स्फोट (Terrible Explosion) झाल्याची घटना घडली आहे. या भीषण स्फोटामुळे डोंबिवली परिसर हादरुन गेला असून या स्फोटाची भीषणता इतकी आहे की, आसपासच्या २-३ किलोमीटरपर्यंत इमारतींना हादरे बसले आहेत. तसेच या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून या स्फोटात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर
३० ते ३५ जण जखमी आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल (Amber Chemical) या कंपनीत स्फोट झाल्याचे बोलले जात असून घटनास्थळी डोंबिवली अग्निशामक दलाचे सात ते आठ बंब दाखल झाले आहेत. तसेच स्फोटानंतर लागलेल्या आगीची दाहकता प्रचंड असल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. याशिवाय आसपासच्या कंपन्यांपर्यंत ही आग (Fire) पोहोचल्याने त्या कंपन्यांनाही धोका निर्माण झाला आहे. तर या केमिकल कंपनीजवळच असलेले ह्युंदाई कारचे शोरुमद देखील आगीच्या भक्षस्थानी सापडले असून या आगीत कंपनीतील नव्या कोऱ्या १० ते १२ कार जळून खाक झाल्याचे समजते. त्यासोबतच अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या देखील फुटल्या आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर घटनास्थळी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून एनडीआरएफ, टीडीआरएफ पथकासह अग्नीशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाणे अद्याप शक्य झालेले नसल्याचे समजते. तर स्फोटातील जखमींना तात्काळ मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत.

डोंबिवली एमआयडीसी स्फोटावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

डोंबिवली एमआयडीसीतील अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. आठ जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमूला पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

जितेंद्र आव्हाड स्फोटाबाबत नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलतांना आव्हाड म्हणाले की, एमआयडीसीने या संदर्भात फायर ऑडिट केले होते का? हा माझा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्र सरकारचे हे डिपार्टमेंट फायर ऑडिट करत नाही. दोन वर्षांपूर्वीही स्फोट झाला होता. काय उपाययोजना केल्या आहेत? एमआयडीसीने किती कंपन्याचं फायर ऑडिट केलं आहे? त्याची श्वेतपत्रिका काढावी. एमआयडीसी हे फक्त पैसे खाण्याचं काम करते आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या