Monday, March 31, 2025
HomeनाशिकAccident News : काकडगावजवळ पिकअपच्या धडकेत दोघांचा मृत्यू; तीन गंभीर

Accident News : काकडगावजवळ पिकअपच्या धडकेत दोघांचा मृत्यू; तीन गंभीर

रखडलेल्या पुलामुळे अपघात झाल्याचा आरोप करत स्थानिकांचा रास्तारोको

अंबासन | वार्ताहर | Ambasan

नामपूर-मालेगाव रस्त्यावरील (Nampur-Malegaon Road) काकडगावनजीक गेल्या तीन ते चार वर्षापासून चालू असलेल्य पुलाच्या कामाने दोन निष्पाप तरूणांचा जीव घेतला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी काकडगाव (Kakadgaon) प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावरील रास्ता रोको आंदोलन छेडले व जोपर्यंत संबधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही, असा संतप्त पवित्रा घेतला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट; किशोर दराडे, संदीप गुळवे यांचा उमेदवारी अर्ज मागे

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार (दि.११) रात्री साडे अकराच्या सुमारास मोराणे (ता.बागलाण) येथील भुषण प्रभाकर गांगुर्डे (वय ४२) रा. मोराणे (ता.बागलाण) व दिनेश हिरामण रौंदळ (वय ४४) बिजोरसे (ता.बागलाण), वेदांत रामचंद्र शेवाळे (वय २८), कुदंन कृष्णा शेवाळे (वय २०) दोघे रा.मोराणे हे नामपूरहून मोराणेकडे जात असताना काकडगावनजीक रखडलेल्या पुलावर आले असता एका पिकअप जोरदार धडक दिली. यात भुषण गांगुर्डे व दिनेश रौंदळ यांचा जागीच मृत्यू झाला तर वेदांत शेवाळे व कुदंन शेवाळे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल करण्यात आले.

...तर पंतप्रधान मोदी 2 ते 3 लाख मतांनी हरले असते; राहुल गांधी यांचा सर्वात मोठा दावा

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक : शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन अर्ज केले दाखल

त्यानंतर जखमी दिनेश व वेदांत यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले. यानंतर सकाळी नामपूर ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या पुलाचे काम ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळेच रखडल्याने अपघात घडत असून सदर ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे रास्ता रोखो आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात काकडगाव, मोराणे, बिजोरसे, अंबासन,  उत्राणे येथील ग्रामस्थ उपस्थित आहेत. तर जायखेडा पोलिस ठाण्याचे (Jaikheda Police Station) पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह दाखल झाले आहेत. 

पुलाची सखोल चौकशी व्हावी

या रस्त्यावर पुलाची मागणी नसतांनाही पुल बांधकाम का केला. पुल केला पण चुकीच्या पध्दतीने केला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या पुलाची सखोल चौकशी व्हावी व आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जोपर्यंत दखल घेतली जात नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा उपस्थित आंदोलकांनी घेतला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

देवगाव शिवारात अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa नेवासा पोलिसांनी (Newasa Police) देवगाव शिवारामध्ये एका डंपरमधून होत असलेल्या अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे....