Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक : धरणात बुडून दोघांचा मृत्यू

नाशिक : धरणात बुडून दोघांचा मृत्यू

नाशिक | Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) अंजनेरी परिसरात (Anjaneri Area) पर्यटनासाठी आलेल्या तीन मित्रांपैकी दोघांचा धरणात बुडून मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रसाद झगरे व वैभव वाकचौरे असे धरणात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे असून प्रतीक वाकचौरे यास स्थानिकांना वाचविण्यात यश आले आहे. नाशिकहून हे तीन मित्र काल (रविवार) अंजनेरी परीसरात पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अंजनेरी (Anjneri Gad) गडासह पाठीमागच्या बाजूस असलेल्या प्रति केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

मोठा दिलासा! LPG Cylinder ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

त्यानंतर अंजनेरी गावाजवळ असलेल्या धरणात (Lake) हे तिघेजण आंघोळीसाठी गेले. यावेळी तिघेही पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. यानंतर स्थानिकांनी तलावाच्या दिशेने धाव घेत काठावर असलेल्या एकाला धरणातून बाहेर काढले. तर दोघेजण पाण्याच्या लाटेत खूप पुढे वाहून गेल्यामुळे दुर्दैवाने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

तसेच या घटनेची माहिती मिळताच त्र्यंबक पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी नाशिक अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मदत घेण्यात आली.

Maharashtra Day : CM एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण, हुतात्म्यांना अभिवादन

दरम्यान, यानंतर अंजनेरी गावातील पोहणाऱ्या युवकांनी पाण्यात उड्या घेत शोधमोहीम सुरू केली असता प्रसाद झगरे याचा मृतदेह सापडला. तर दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम काल अंधार झाल्यामुळे थांबविण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु झाली असून याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या