नवी दिल्ली | New Delhi
झारखंडमधील चक्रधरपूर रेल्वे मंडलच्या बाराबम्बो रेल्वे स्टेशनजवळ हावडा-मुंबई एक्सप्रेसचे (Howrah-Mumbai Express) १८ डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात आतापर्यंत दोन प्रवाशांचा मृत्यू (Death) झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
हे देखील वाचा : Kerala Landslide News : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; ११ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील (Jharkhand) टाटानगरच्या जवळ असलेल्या सरायखेलामध्ये रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. ही रेल्वे हावड्यावरून (पश्चिम बंगाल) मुंबईला जात होती. या रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सहा जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.या सर्व जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार केले जात असून घटनास्थळी काही रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा : एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे अन् अमित शाहांना भेटायचे; संजय राऊतांचा दावा
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पोलीस (Police) घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच घटनास्थळी पोहचलेल्या रेल्वे कर्मचारी, एडीआरएम, पोलीस, प्रशासनाने जखमींना रेस्क्यू केले आहे. त्याचसोबत या ट्रेनमधील ८० टक्के प्रवाशांना चक्रधरपूर रेल्वे स्टेशनला पाठवले आहे. तर या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे.
हे देखील वाचा : अजितदादा, भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचा संकल्प – तटकरे
हेल्पलाईन नंबर खालीलप्रमाणे
टाटानगर : 06572290324, चक्रधरपूर : 06587 238072, हावडा : 9433357920 व रांची : 0651-27-87115 हे हेल्पलाईन नंबर रेल्वेने जारी केले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा