नाशिक : प्रतिनिधी
- Advertisement -
शहरातील बहुचर्चित आसाराम बापू पुलावरून भरधाव कार नदीपात्रात कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास होंडा सिटी कार क्रमांक एमएच 43 एल 4139 म्हसरुळ कडून गोदावरी नदीवरील बापू पुलाकडे जात होती.
कारचा वेग अधिक असल्यामुळे येथील वळणावर कारवरील चालकाचा ताबा सुटला. कार थेट गोदावरी नदीपात्रात जाऊन कोसळली.
या घटनेत कारचालक कल्पेश प्रभाकर मेश्राम (वय 28) व त्याचा मित्र भूषण मुरलीधर तिजारे (वय 28) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.