Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशVideo : पुन्हा एकदा रेल्वे अपघात! एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला धडक, १२...

Video : पुन्हा एकदा रेल्वे अपघात! एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला धडक, १२ डब्बे रुळावरून घसरले

दिल्ली | Delhi

ओडिशा येथील बालासोर रल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा दोन मलगाड्यांची समोरासमोर टक्कर झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

ही घटना पश्चिम बंगाल राज्यातील बांकुरा (Bankura) येथील ओंडा रेल्वे स्थानकावर (Onda Railway Station घडली. दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या, त्यानंतर अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. ही घटना आज (रविवारी) पहाटे चार वाजता घडली. या घटनेत मालगाडीचा चालक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मालगाडीने दुसऱ्या मालगाडीला मागून धडक दिली, त्यामुळे सुमारे १२ डबे रुळावरून घसरले आहेत.

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मालगाड्या रिकाम्या होत्या. अपघाताचे कारण काय आणि दोन्ही गाड्यांची टक्कर कशी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातामुळे आद्रा विभागात अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे. या दुर्घटनेनंतर पुरुलिया एक्स्प्रेससारख्या काही गाड्या या विभागातून जाण्यासाठी अप मार्ग लवकरात लवकर खुला करण्याचा रेल्वे अधिकारी प्रयत्न करत आहेत. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. यात मालागाडीचे इंजिन रेल्वे रूळावरून खाली घसरलं आहे. एका मालगाडीचं प्रचंड नुकसानही झाल्याचं यामध्ये दिसत आहे. ही मालगाडी असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेत रेल्वे चालक जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे मालगाडीचे डब्बे रुळावरून हटवण्याचे काम सुरू झालं आहे.

Biggest Train Accidents In India : भारतातील भीषण रेल्वे अपघात, ज्यांनी देशाला हादरवून सोडले… वाचा, कधी अन् कुठे झालेत अपघात?

दरम्यान, गेल्या महिन्यात ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेचा विचित्र अपघात झाला होता. यात २८८ जणांचा मृत्यू, तर एक हजारच्यावर जण गंभीर जखमी झाले होते. अशातच मालगाडीचा हा अपघात घडल्याने रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या