Wednesday, September 11, 2024
HomeनाशिकNashik Accident News : मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

Nashik Accident News : मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

इगतपुरी | प्रतिनिधी |Igatpuri

घोटी-सिन्नर महामार्गावरील (Ghoti-Sinnar Highway) साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सिन्नरकडून येणारी मोटारसायकल क्रमांक (एमएच १५ एचएस ६८५२) व मोटरसायकल क्रमांक (एमएच १५ जीके ९३१४) या दोन मोटारसायकलींना घोटीकडून सिन्नरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Dindori Loksabha 2024 : दिंडोरी लोकसभेतून माकपचे जे पी गावित घेणार माघार

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली असून अपघात करणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले आहे. तर या अपघातात प्रकाश उल्हास टिळे (वय ३५ रा. शेणित) सोमनाथ पांडुरंग सदगीर (वय ३६ रा. पारदेवी) हे दोघे जागीच ठार झाले. तर गोकुळ किसन बिन्नर (वय ३८ रा. पारदेवी) सार्थक भास्कर जाधव (वय १२ रा. शेणित) हे दोन गंभीर जखमी झाले आहेत. तसेच ओमकार प्रकाश टिळे (वय १३ रा. शेणित) हा किरकोळ जखमी आहे.

हे देखील वाचा : नाशिक महापालिकेच्या हद्दीत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

दरम्यान, या अपघातातील सर्व जखमींना पुढील उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT Hospital) दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात (Wadivarhe Police Station) अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस (Police) पथक करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या