Sunday, May 19, 2024
Homeनाशिकनाशकात दोघांच्या आत्महत्या

नाशकात दोघांच्या आत्महत्या

नाशिक | Nashik

शहरात विविध दोन ठिकाणी एक व्यक्ती व एका युवतीने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत…

- Advertisement -

विषारी औषध सेवन करून युवतीने आत्महत्या केल्याची घटना नवीन नोट प्रेस परिसरात घडली. सोनाली प्रदीप चापळकर (२४, रा. नवीन नोट प्रेस, जेलरोड ) असे आत्महत्या करणार्‍या युवतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केले. तीला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

दसुर्‍या घटनेत जेलरोडच्या चंपानगरी परिसरात राहणारे कुमार प्रतापराव डावरे (४२) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डावरे याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने छताच्या पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या