Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यागावठी कट्ट्यासह दोघे ताब्यात

गावठी कट्ट्यासह दोघे ताब्यात

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निर्माण केलेल्या दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने पांडवलेणी जवळ सापळा रचून दोघा व्यक्तींकडून एक गावठी कट्टा -पिस्टलसह ०२ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात यश मिळविले.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदीरानगर पोलीस ठाणे हद्दीत पांडव लेणी जवळ, फाळके स्मारक समोर रोडवर दोन व्यक्ती गावठी कट्टा पिस्टल घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती दरोडा व शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. यावरून वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक किरण रोंदळे, विजय कुमार सुर्यवंशी, श्रीशैल सवळी, प्रफुल्ल गांगुर्डे, कडुबा पाटील,संदीप डावरे, प्रवीण चव्हाण, महेश खांडबहाले, महिला पोलीस मनीषा मल्लाह कांबळे यांनी परिसरात सापळा रचला

.

यात संशयित अमन राजेंद्र उजैनवाला (२५, धंदा नोकरी,रा. गुरुमहिमा बंगलो, हरीओम निवास समोर, जयभवानी रोड, नाशिकरोड) , राहुल अजय उजैनवाला (२३, धंदा मजूरी रा. साईश्रध्दा अपार्टमेंट, प्लॅट नं. ०२, फर्नांडीसवाडी, जयभवानीरोड, नाशिकरोड) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून ०२ जिवंत काडतूस व एक गावटी कट्टा -पिस्टल व मोटार सायकल (एमएच १५ एचई ४१९८) हस्तगत केली.

दरम्यान संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली असता सदरचा गावठी कट्टा -पिस्टल व राउंड हे बडे राहणार धुळे (पुर्ण नांव पत्ता माहीती नाही), विजय सरजित बेहनवाल उर्फ छंगा आणि किसन (रा. फर्नांडीसवाडी, जयभवानी रोड, नाशिकरोड, नाशिक) यांचेकडुन विकत घेतल्याचे कबुल केल्याने चारही संशयितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या