Sunday, June 14, 2026
HomeUncategorizedकारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

चांदवड | प्रतिनिधी Chandwad

- Advertisement -

मुंबई-आग्रा महामार्गावर मंगरुळ टोल नाक्याशेजारी कारने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात मालेगाव येथील शेख सुलतान शेख हुसेन (४२) यांचा मृत्यू झाला.

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड ते नाशिक जाणार्‍या लेन वर तवेरा कार क्र. एम एच-१५-बी एस-३३५३ पुढे जात असलेल्या स्प्लेंडर दुचाकी क्र. एमएच-४१- झेड-७६४७ हिला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की कारने दुचाकी ५० ते ६० फूट लांब फरफटत नेली. या धडकेत दुचाकी चालक शेख सुलतान शेख हुसेन यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यांचा भाऊ शेख इरफान शेख हुसेन यांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने कारचालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...