मुंबई । Mumbai
निवडणूक आयोगाच्या विविध प्रक्रियांवर आणि मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप घेण्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयुक्तांच्या भेटीला दाखल झाले. या शिष्टमंडळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश असल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले.
- Advertisement -
महत्त्वाची बाब म्हणजे, युतीच्या चर्चांना जोर येत असतानाच आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे प्रवास करत मंत्रालय गाठले. या दोन नेत्यांच्या एकत्रित कृतीमुळे राजकीय वर्तुळात वज्रमूठ अधिक घट्ट झाल्याची चर्चा आहे, तर आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीत मोठा बदल होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.




